करमाळासोलापूर जिल्हा

लोकनियुक्त सरपंच कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

करमाळा समाचार -संजय साखरे

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२१ गुणीजन गौरव परिषद यांच्या वतीने लोकमान्य टिळक स्मारक मंदिर पुणे येथे आज मोठ्या थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला मनुष्यबळ लोकविकास सेवा अकादमी च्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, साहित्य, ग्रामीण विकास आदि क्षेत्रामधुन भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

ग्रामविकास विभागातुन सोलापूर जिल्ह्यामधून एकमेव मांजरगाव (ता. करमाळा ) च्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांना ह.भ.प. श्री.शामसुंदर महाराज आळंदीकर सुप्रसिद्ध विचारवंत पत्रकार कवी यांच्या हस्ते, माननीय श्री रमेश आव्हाड सुप्रसिद्ध साहित्यिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवारत्न पुरस्कार २०२१ आज सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. मांजरगाव सारख्या छोट्या गावामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी सतत पत्रव्यवहार व, पाठपुरावा करून गावामध्ये हव्या असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या गेल्या ४ वर्षात भरीव कामगिरी बजावली आहे.माजी जि.प अध्यक्ष व विद्यमान आमदार मा.संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातुन मांजरगाव साठी कोट्यावधी चा निधी मंजूर करून गावामध्ये सर्व भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टर, गावातील क्राँकीटी करण , शैक्षणिक दर्जा सुधारण्या साठी शाळेस अत्याधुनिक साधने इमारत दुरुस्ती, सार्वजनिक ठिकाणी सभामंडप, जागोजागी विद्युत व्यवस्था, स्मशान भुमीत भौतिक सुविधा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी घरोघरी शोषखडडे, जास्तीत जास्त बचत गटामार्फत महिला सबलीकरण, लघु उद्योगाना चालना,दलित वस्ती विकास योजना, घरकुल योजना, जनसुविधा योजना, सेस फंड योजना इत्यादी योजनां मधुन गावासाठी भरघोस निधी मिळवुन ग्रामविकास घडवुन आणला याचच फलित म्हणुन ग्रामिणविकास विभागातुन दिला जाणारा मानाचा असणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवारत्न पुरस्कार २०२१ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपसरपंच श्री.आबासो चव्हाण, माजी सरपंच श्री महेशकुमार कुलकर्णी, श्री सचिन चव्हाण, श्री प्रकाश चव्हाण, श्री सागर चव्हाण, ग्रा.पं. सदस्या सौ स्वाती कुलकर्णी, सौ गौरी कोराटे उपस्थीत होते , यावेळी बोलताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या कि ग्रामविकास करत असताना मला आमचे दैवत लोकनेते स्व. साहेबराव (आण्णा ) पाटील यांचा आशीर्वाद व युवा नेते मा. संतोष आप्पा पाटील यांचे कायम मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली, तसेच सर्व ग्रामस्थ,सर्व जेष्ठ मार्गदर्शक, सर्व हितचिंतक ,उपसरपंच श्री.आबासो चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक कांबळे भाऊसाहेब, ग्रामपंचायत शिपाई मामु खरात यांचे कायम सहकार्य मिळाले. हा पुरस्कार मी या सर्वांना समर्पित करते .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE