करमाळासोलापूर जिल्हा

हेमाडपंथी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान ; श्रावण महिन्यातील सोमवारी हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात

संजय साखरे – करमाळा 


करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनी बॅक वॉटर परिसरातील केत्तुर या ठिकाणी जलाशयाच्या काठी असलेले महादेवाचे मंदिर या परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महादेवाचे हे मंदिर पुरातन हेमाडपंथी असून ते किर्तेश वर या नावाने प्रसिद्ध आहे.

काशी खंडामध्ये या पुरातन देवस्थानाचा उल्लेख केतकी वनातील किरतेश्वर असा येतो. देवाच्या नावावरून या गावाला केत्तुर असे नाव पडले आहे. 1996 साली या गावांमध्ये 33 कोटी नामजप यज्ञ झाला होता. या यज्ञास करवीर पीठाचे शंकराचार्य उपस्थित होते. हे मंदिर या परिसरातील गावांमध्ये प्रसिद्ध असून श्रावण महिन्यातील सोमवारी हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात .

श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे फराळ खिचडीचे वाटप केले जाते .तसेच शेवटच्या सोमवारी याठिकाणी प्रवचन भजन व अन्नदानाचा कार्यक्रम असतो.

हे देवस्थान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग क मध्ये समाविष्ट असून सदर आराखड्यातील निधी लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा चालू आहे
लक्ष्मीकांत पाटील -ग्रामस्थ,केत्तुर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE