करमाळासोलापूर जिल्हा

मंडप ॲन्ड डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार समीर माने यांना निवेदन

करमाळा – अमोल जांभळे 

कोरोना काळात मेटाकुटीस आलेल्या व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे या मागणीसाठी करमाळा मंडप ॲन्ड डेकोरेटर्स असोसिएशन च्या वतीने तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देताना नियम शिथिल करण्याची मागणीही केली आहे.

मार्च २०२० पासून कोविड महामारीच्या पादुर्भावामुळे राज्यात मंडप मंगल कार्यालय, लॉन धारकांवर पन्नास लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे निर्बंध टाकण्यात आले व ते आजही लागू आहेत. गेल्या दोन वर्षापासून शासनाचे नियमांचे पालन करुन शासनास सहकार्य करत आहोत तर लग्न समारंभाची निगडीत अनेक व्यवसाय आहे. हा व्यवसाय सीझन पुरता मर्यादित आहे. हा व्यवसाय हजारो लोकांना रोजगार देणारा आहे.

कोरोनामुळे व्यवसायिक आर्थिक संकटात सापडलेला आहे. हा व्यवसाय करण्यासाठी ५० टक्के आसन व्यवस्थेची परवानगी द्यावी. या मागणीसह व्यवसाय वर लागलेला १८ टक्के जीएसटी कर कमी करून पाच टक्के करावा, लाईट बील मधील फिक्स चार्ज कमी करावेत, औद्योगिक वसाहतीमध्ये गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कर्मचारी यांचा पीएफ मध्ये सवलत व स्थिती सामान्य होईपर्यंत शासनाने याचे भुकतान करावे,

ads

समारंभाच्या ठिकाणी जीएसटी वधूपित्याला परत मिळण्याची तरतूद करावी, कर्ज धारकाचे व्याज माफ करावे, मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन इत्यादी संबंधित व्यवसाय हे कोरोना महामारी काळात अत्यावश्यक सेवा मध्ये राहणे गरजेचे आहे. या सर्व सेवा या महामारीकाळात देशासाठी योगदान देत आहेत अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष दिलीप शिरगिरे, सचिव संपतराव जाधव, अनिकेत अडसूळ, जावेद झारेकरी, मंगेश गोडसे, जाकिर झारेकरी, बबन मुलाणी, अमोल जांभळे आदी उपस्थित होते

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE