करमाळासोलापूर जिल्हा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ

करमाळा प्रतिनिधी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा शहरात 6 मार्च व 7 मार्च रविवार व सोमवारी आरोग्याचा महायज्ञ होणार आहे. यावेळी रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप, मोफत विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे(mahesha chivate) यांनी केले आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, संजय भालेराव, संतोष मोटे, मोहम्मद रफी कुरेशी, दीपक भोसले, नागेश शेंडगे, नीलेश चव्हाण, अण्णा यादव, दशरथ कांबळे, राजेंद्र घाडगे, राजेंद्र चव्हाण, संजय जगताप, बनसोडे, मारुती भोसले, केशव साळुंखे, भक्ती गायकवाड, कोमल भिसे, आरती मासाळ, सुवर्णा सुरवसे, सविता सुरवसे आदी प्रयत्न करत आहे.

याशिबिरामध्ये किडनी विकार, मधुमेह, नाक, घसा, मुत्रविकार, हृदयरोग, कर्करोग अशा अनेक आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिले जाणार आहे. एखाद्या रुग्णाला मोठी शस्त्रक्रिया करायची गरज भासली तर तर त्याची शासकीय योजनेतून व्यवस्था करण्यात येणार आहे.

यावेळी 1000 चष्मे डोळे तपासून मोफत वाटप करण्यात येणार आहे. एन्जोप्लास्टी, ऍन्जिओग्राफी, बायपास सर्जरी या महागड्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करून देण्यासाठी रुग्णांची नोंदणी करून घेण्यात येणार आहेत. या तपासणीसाठी मुंबई येथील प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर येणार आहेत.

रविवारी सकाळी दहा वाजता या शिबिराच्या सुरुवात होणार असून सोमवारी सकाळी दहा सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. करमाळा तालुक्यातील व परिसरातील नजीकच्या गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. करमाळा देवीचामाळ रोडवरील अमरनाथ टॉवर्स होंडा शोरूम शेजारी हे आरोग्य शिबिर होणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE