राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत करमाळ्याच्या वैष्णवीचे यश
करमाळा, दि. 21-
महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मिनी सब ज्युनियर आर्चरी स्पर्धेत करमाळा येथील खेळाडू वैष्णवी पाटील हीने यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी तिची सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली होती.

वसमत (जि. हिंगोली) येथे सोळा ते अठरा मे दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत वैष्णवी हीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना गाथा खडके (पाटकूल) व रेश्मा (पंढरपूर) यांच्यासह सांघिक चौदा वर्षाखालील इंडीयन मुली गटात उल्लेखनीय कामगिरी करुन सुवर्णपदक पटकाविले आहे. सदर स्पर्धेत त्यांच्या संघाने अहमदनगर व पुणे संघाचा पराभव केला.

वैष्णवी हीला मोडनिंब येथील प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांनी मार्गदर्शन केले.