करमाळासोलापूर जिल्हा

यंदा गणपती स्वागताला कोरोनाचे विघ्न ; सार्वजनिक ठिकाणी विक्रीसह स्थापनेलाही बंदी

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

दिनांक 19/08/2020 रोजी तहसिल कार्यालय, करमाळा आणि करमाळा पोलीस ठाणेचे वतीने पंचायत समिती सभागृह, करमाळा येथे सार्वजनिक गणेशोत्सव सन 2020 चे अनुषंगाने करमाळा शहर व तालुक्यातील शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी यांची मिटींगआयोजीत करण्यात आली होती. सदर मिटींगदरम्यान मा. जिल्हाधिकारी साो, सोलापूर तसेच मा. पोलीस अधीक्षक साो, सोलापूर ग्रामीण यांचेकडील परिपत्रकानुसार खालील विशयांवर चर्चा करण्यात आली.

मिटींगदरम्यान चर्चेतील विषय:-

1) सर्व गणेश मंडळांच्या मुर्ती पक्क्या बांधकामाशिवाय इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या शेड/मंडपांमध्ये श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाहीत.

2) कोणत्याही गणेश मंडळास परवानगी दिलेल्या श्री गणेशाच्या आगमनाची वेळी व विसर्जनाचे वेळी कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवून मिरवणूक काढता येणार नाही.

3)सार्वजनिक गणेशमंडळांकडून प्रतिष्ठापना करण्यात येणा-या श्री गणेश मूर्ती 4 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंची असावी तसेच घरगुती स्थापन करण्यात येणा-या गणेशमुर्तीची उंची 2 फुटांपेक्षा अधिक नसावी.

4)प्रतिष्ठाणेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम/व्याख्याने/स्पर्धा/सिनेमा दाखवणे/ऑर्केस्ट्रा यावर संपूर्णतः बंदी घालण्यात आलेली असल्याने कोणीही याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करणार नाहीत.

5) उत्सवादरम्यान फक्त आरतीची वेळी सकाळी 07/00 वा. ते 10/00 वा. पर्यंत व सायंकाळी 06/00 वा. ते 09/00 वा. पर्यंत बेस विरहित 2 छोटे (2 ग् 3 फुटाचे ) स्पीकर ची साऊंड सिस्टिम लावण्याची परवानगी असेल. त्याबाबत आमची कायदेशीर परवानगी घ्यावी हे करीत असताना आपणाकडून ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन अधिनियम 2014 उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

6) प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी किंवा परिसरांमध्ये कसलेही पोस्टर/बॅनर अथवा होर्डींग्ज लावता येणार नाहीत तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सजीव/निर्जीव देखावा करता येणार नाही.

7) ज्या पक्या बांधकामांमध्ये श्री ची स्थापना केली आहे त्याच्यासमोर सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारचा मंडप अथवा शेड उभा करता येणार नाही.

8) श्री चे आरती ची वेळ फक्त 10 किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती बवअपक-19 बाबत नियमाचे पालन करून हजर असतील त्यासाठी आपण आरतीचे ठिकाणी कोव्हीड- 19 चे अनुषंगाने सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून हजर असतील. त्यासाठी आपण आरतीचे ठिकाणी कोव्हीड – 19 चे अनुशंगाने सोषल डिस्टंसिंग नियमांचे पालन होण्यासाठी अगोदरचे मार्किंग करून घेणे संबंधित गणेश मंडळांचे अध्यक्ष यांची जबाबदारी असेल.

9) तसेच संपूर्ण उत्सव काळात प्रतिष्ठापणा केलेल्या गणपती मुर्तींचे संरक्षणाची जबाबदारी आपणावर असेल तसेच आपण प्रतिष्ठापणा केलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी फक्त 10 किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींना कोणतेही वाद्य साऊंड सिस्टिम शिवाय परवानगी देण्यात आलेली असून आपणास मूर्तीचे विसर्जन दरवर्षीप्रमाणे पारंपारिक सार्वजनिक विसर्जनाची ठिकाणी करता येणार नाही त्यासाठी एक तर आपण स्थानिक प्रशासनाने कृत्रिमरीत्या तयार केलेल्या विसर्जन ठिकाणी विसर्जन करावेत किंवा श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करिता स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्त करावी किंवा यावर्षी विसर्जन न करता श्री गणेश मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवून पुढील वर्षी विसर्जन करण्यात यावी.

10) संपूर्ण गणपती उत्सवा दरम्यान बवअपक-19 चे अनुषंगाने सोशल डिस्टंसिंग बाबत शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्व गणेषमंडळांनी खबरदारी घेणे बंधनकारक असेल.

11) गणेश आरतीचे वेळी 60 वर्श वयावरील नागरीकांनी आरतीमध्ये सहभागी होवू नये.


यावेळी शांतता समिती मिटींगकरीता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा, मा. तहसिलदार करमाळा, पोलीस निरीक्षक, श्रीकांत पाडुळे, सौ. विणा पवार, मुख्याधिकारी नगरपरिशद,करमाळा, मा. श्री. विलास घुमरे ( सर), श्रीमती. सवितादेवी राजेभोसले (सामाजिक कार्यकत्र्या) इतर शासकिय अधिकारी, पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्य तसेच गणेशमंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE