करमाळासोलापूर जिल्हा

इलेक्ट्रिक उपकरणात स्पोट कमलाईचा एक कर्मचारी गंभीर जखमी

करमाळा समाचार

विठ्ठल रिफाईंड शुगर तथा कमलाभवानी शुगर कारखाना लि. पांडे येथील कारखान्यात इलेक्ट्रॉनिक विभागात नोकरीत असलेले बोरगाव येथील कर्मचारी श्री गणेश नवनाथ खराडे हे विद्युत उपकरणाचे काम करत असताना तेथील उपकरणात स्पोट होऊन शरीरावर अनेक ठिकाणी भाजले आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे पाठवले आहे.

सुरुवातीला करमाळा येथील काॅटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी अश्विनी हाॅस्पिटल सोलापूर येथे हलविण्यात आले. याबाबत कारखान्याचे चेअरमन मा. विक्रम शिंदे यांना फोन लावून संबंधित घटनेची जबाबदारी स्विकारुन त्या कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचारावर स्वतः लक्ष ठेवण्याचे आवाहन करमाळा ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे यांनी केले.

संबंधित कर्मचाऱ्यांवर दवाखान्याचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नाही. यासाठी कारखान्याने सर्वोतोपरी मदत करण्याचे मान्य केले आहे. व मोठ्या दवाखान्यात दाखल करण्याचे आश्वासनही दिले आहे

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE