करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर तीन प्रभागात राखीव
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण आज जाहीर झाले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी दोन तर एक जागा सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सदर जागेची सोडत करमाळा येथील महादेव मंदिरा समोर जयवंतराव नामदेवरावजी जगताप बहुउद्देशीय सभागृह येथे पार पडली.

करमाळा शहरातील नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर करीत असताना प्रांत ज्योती कदम, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी करमाळा नगरपरिषदेच्या 20 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक दहा येथे आरक्षण महिलांसाठी राखीव अनुसूचित जातीसाठी राहिले आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण जागा आरक्षित करण्यात आले आहे.

सर्व प्रभागांमध्ये एका महिलेसाठी जागा राखीव ठेवण्यात आले आहे. सर्व प्रभागांमध्ये अ आणी ब असे दोन गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात प्रभाग सात वगळता अ गट हा महिलांसाठी राखीव तर केवळ सात नंबर प्रभागांमध्ये ब हा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.