करमाळासोलापूर जिल्हा

श्री. अदिनाथ कारखाना ताब्यात घ्यायला गेल्यावर गुळवे आले रिकाम्या हाती ; गुळवेंची नाराजी

करमाळा समाचार 

ज्यांचा ऊस हा सहकारी कारखान्यांना न जाता बारामती ॲग्रो ला नेला जातो अशा लोकांनी बारामती ॲग्रो तसेच पवार कुटुंबीयांना नाव ठेवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी म्हटले आहे. करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली.

मागील आठवड्यात डीआरडी कोर्टाने बारामती ॲग्रोच्या बाजूने निकाल देत त्या ठिकाणी सात दिवसाच्या आत कारखाना बारामती ॲग्रो ला हस्तांतरित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. आज त्या माध्यमातून बारामती ॲग्रो चे अधिकारी तसेच उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले हो.ते त्या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील व त्यांचे कार्यकर्तेही पोहोचले व माजी आमदार यांनी आपण पैसे भरल्याचे सांगितले. त्यावरून आजही पुढची प्रोसेस न झाल्याने सुभाष गुळवे हे नाराज झाले आहेत.

मागील चार वर्षांपासून कारखाना बंद होता. तेव्हापासून माजी आमदार का गप्प होते, त्यांनी कारखान्याच्या संदर्भात काय लक्ष दिले नाही, त्या ठिकाणची रक्कम का भरली नाही ? असा सवाल गुळवे यांनी उपस्थित केला आहे. आज करमाळा तालुक्यातला ऊस मोठ्या प्रमाणावर बारामती ॲग्रो ने नेला होता. आज बारामती ॲग्रो सारखा इतर कोणताच कारखान्या भाव देत नसल्याने शेतकरीही बारामती ॲग्रो कडेच कारखाना जावा यासाठी सकारात्मक आहे असे गुळवे यांनी सांगितले.

मुळात कारखाना बारामती ॲग्रो कडे जाण्याची प्रोसेस सगळी पूर्ण झालेली आहे. आज भरलेली रक्कम ही काहीच उपयोगाची नसून कारखाना हा फक्त बारामती ॲग्रो कडेच हस्तांतरित केला जाऊ शकतो. यात आता संचालक मंडळ सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही असे गुळवे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे मा. आ. नारायण पाटील यांनी एक कोटी रुपये भरले आहेत. त्याचे काय होईल पुढे त्यानंतर पाटील काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE