करमाळ्याच्या गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून हजारो महिलांची अंगठे बहाद्दर ओळख पुसली
करमाळा समाचार –
स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य असलेल्या करमाळा तालुक्यातील सुनंदा सरोदे वय 45 यांच्या आत्मविश्वास आता वाढला आहे. कारण तसेच आहे त्या अंगठे बहाद्दर म्हणून ओळखल्या जाणार नाहीत. त्या कागदावर पत्रावर सही करायला शिकले आहेत. सुनंदा यांच्यासह सातशे महिलांनी यापुढे अंगठे बहाद्दर मानता येणार नाही. थम्स डाऊन मोहिमेअंतर्गत या सर्वांनी सह्या करणे शिकले आहे. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ही मोहीम साकारली आहे.

राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेद राबवले जात आहे. या अंतर्गत 19 बचत गटाची नोंदणी झाली आहे. या गटांमध्ये 21 हजारापेक्षा अधिक महिला आहेत . ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आत्मविश्वास आत्मसान मन वाढावा यासाठी त्यांच्यामध्ये साक्षरते बाबत जागरूकता निर्माण करणे हाही उमेशचा हेतू असल्याचे करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले.

बचत गटातील अनेक महिलांना सही करता येत नाही या कागदपत्रांवर त्या अंगठा लावतात हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. आपण स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत त्यामुळे महिलांनी आता अंगठा वापरणे बंद करून सही शिकली पाहिजे. यासाठी ही मोहीम राबवल्याचे राऊत यांनी सांगितले. बचत गटाच्या 21843 पैकी 4000 महिलांना सही करता येत नव्हती. बचत गटातील अन्यशिक्षित महिला आणि बचत गटात समन्वयकाच्या मदतीने आम्ही या महिलांना त्यांच्या नावाची सही करायला शिकवले.
*मला रिझल्ट पाहिजे ; आढावा बैठकीत आ. शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना*
मला रिझल्ट पाहिजे ; आढावा बैठकीत आ. शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
या महिलांनी नवीन कौशल्य शिकले आहे. मात्र त्यात धोकाही आहे. कदाचित नको त्या कागदावर ही त्या सह्या करू शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना सतर्क केले असून कर्जमाफी अर्ज शिवाय अन्य कोणत्याही कागदावर सह्या करू नये अशा सूचना दिल्या आहेत. – मनोज राऊत गट विकास अधिकारी करमाळा.
आत्मविश्वास वाढला- सुनंदा सरोदे
मला सही येत नव्हती त्यामुळे कर्जाच्या कागदपत्रावर मला अंगठा करावा लागत होता. आता मी सही करायला शिकले आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. असे सुनंदा सरोदे यांनी सांगितले आणि एक सदस्य लता कदम यांनीही अशीच भावना व्यक्त केली.