E-Paperकरमाळा

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष लवकरच पडद्यावर ; करमाळ्याचा अभिनेता तर लातुरची अभिनेत्री प्रमुख भुमिकेत

करमाळा समाचार -संजय साखरे

कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ‘ MPSC’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक /राईटर सचिन डोईफोडे आणि सतिश सांडभोर यांनी दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांच्या तिकिटबारीवर दुष्काळ असताना. कोरोना व लॉकडाउनच्या भयावह वातावरणातही हा चित्रपट आपलं शूटिंग पूर्ण करण्यात यशस्वी झाला आहे. हे केवळ प्रेक्षकांचं प्रेम आणि शुभेच्छांच्या बळावरच शक्य झाल्याचं मत ‘MPSC’च्या टीमनं व्यक्त केलं आहे.

द ग्रिन इंडीया प्रा. लि.च्या बॅनरखाली सचिन डोईफोडे आणि सतिश सांडभोर व योगेश राजपूत यांची निर्मिती.असलेल्या टीम ने दुसऱ्या लॉकडाऊननंतर पुन्हा निर्बंध शिथिल होताच टीमनं वेगवान हालचाली करत अल्पावधीत शूटिंगचं पुढील शेडयुल आखत बीड जिल्ह्यातील केज आणि कासारी येथे या गावात शूटिंग करण्याची योजना आखली.

‘MPSC’ चे पूणे येथे अखेरचं शूटिंग शेडयुल नुकतंच निर्विघ्ननपणे संपन्न झालं असून, या दरम्यान पुन्हा एकदा कलाकार-तंत्रज्ञांना धम्माल करण्याची संधी मिळाली. चित्रपटामधे प्रमुख हिरोची भूमिका करमाळ्याचे (राजुरी) गणेश मोरे यांनी केली .व हिरोईन ची भूमिका लातूरची प्रणिता शिंदे हीने केली.

तसेच निहार भालेराव, संदिप वायबसे किरण, प्रशांत मुरकुटे, दाजी पाटील, चैत्राली जाधव, ज्योती शिंदे, रीतेश, तुषार,श्रवण,अर्थव, विकी चोडके, मस्के सर, माऊली, दूरवास चौरे, सुरज तांबडे, तसेच दडंम या गाजलेल्या मराठी चित्रपटातील संतोष वारे (सर)यांनी काम केले आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. महाराष्ट्रातील आजकालच्या तरूण पिढीला स्पर्धा परिक्षा देताना खुप गोष्टींचा अनुभव येतो. या विषयावर भर देण्याच काम या चित्रपटात केल आहे .

दिग्दर्शनासोबतच ‘MPSC’ची संकल्पना दिग्दर्शक, कथा आणि पटकथाही सचिन डोईफोडे यांचीच आहे.आणि सतिश सांडभोर हे चित्रपटाचे डीओपी आहेत.प्रशांत मुरकुटे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानं ‘MPSC ’ची संपूर्ण टीम खूप आनंदी असून, लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे. सचिन डोईफोडे यांचा झाड नंतर हा दूसरा चित्रपट असल्याच दिग्दर्शक डोईफोडे यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE