करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

पंचायत समीती निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर ; उमरड व वांगीला अ. जा. आरक्षण

करमाळा समाचार – लाईव्ह सुरु आहे ..

तालुका पंचायत समीती आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी पार पडली. यावेळी १२ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरु झाली. एस सी, एस सी महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग या जागांसाठी आरक्षण निश्चित केले आहे.

त्यामध्ये एस सी साठी ३१६८२ लोकसंख्या आहे. त्यात १२ गणासाठी २ जागा निश्चित त्यात एक जागा महिलेला. जमातीसाठी जागा नाही तर नामाप्र जागा ३ आहेत त्यात २ महिला तर सर्वसाधारण ७ जागा असुन यात ३ महिलांसाठी राखीव राहणार आहे. एकुण १२ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव आहे.

जाहीर झालेले आरक्षण … महिलांसाठी आरक्षण बाकी … जसे जाहीर होईल तसे अपडेट होईल आहे. ती बातमी रिफ्रेश करा.

ads

रावगाव – सर्वसाधारण
पांडे- सर्वसाधारण (महिला )
हिसरे – सर्वसाधारण
वीट – ना.मा.प्र. (महिला )
कोर्टी – सर्वसाधारण (महिला )
केत्तुर- सर्वसाधारण
चिखलठाण – सर्वसाधारण (महिला )
उमरड – अनुसूचित जाती (महिला )
जेऊर – ना. मा. प्र.
वांगी – अनुसुचित जाती
साडे – सर्वसाधारण
केम – ना. मा. प्र. (महिला ) ११:३८ पर्यत रिफ्रेश करा . यानंतर  आरक्षण प्रक्रिया संपली आहे.

रावगाव वीट साडे ना. मा. प्र साठी चिठ्ठी काढण्यात आली. सदर चिठ्ठी तिसरीच्या मुलाने काढली.

नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड,  तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह विविध पक्षाचे व गटाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी देवानंद बागल, संतोष वारे, अशोक सरडे, राजू कांबळे, उदय ढेरे, चंद्रकांत सरडे, नरेद्र ठाकुर, अंगद देवकते आदि उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE