E-Paperताज्या घडामोडी

कॉग्रेसमधुन भाजपात गेलेल्या विखेंना कॅबीनेट मंत्रीपद ; सोलापूरच्या एका मंत्र्याने घेतली शपथ तर बच्चु कडुंचे नाव पहिल्या यादीत नाही

समाचार टीम –

अखेर सत्ता स्थापनेनंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडत आहे. यामध्ये एका वेळी 18 मंत्री हे शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॉग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान भाजपात असलेले राधाकृष्ण विखे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील तानाजी सावंत यांचा समावेश असणार आहे. मुळात तानाजी सावंत हे जरी सोलापूर जिल्ह्यातील असले तरी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील आमदार आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यपाल यांना बाबत नावे पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून या सर्व मंत्रिमंडळ शपथविधी आज सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सदर मंत्रिमंडळ आज शपथ घेण्यात येत आहे. यावेळी भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांची शपथ होत आहे.

यामध्ये कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगल प्रभात लोढा आदींचा समावेश आहे.

मागील अनेक दिवसांपासून बच्चू कडू हे कॅबिनेट मंत्री पदासाठी आग्रही असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण सुरुवातीच्या 18 मंत्र्यांमध्ये बच्चू कडू चे नाव न आल्याने बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पुढे बच्चु कडु यांच्या भुमिकेकडे लक्ष लागुन राहणार आहे. पहिल्या यादीत नाव न आलेले कडु यांना कोणते स्थान मंत्रीमंडळात मिळणार यावरुन राजकारण तापु शकते. सुरुवातीपासुन कडु हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने त्यांना मोठे स्थान मिळेल असेही बोलले जात होते. पण पहिल्या यादीत निराशा हाती लागली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE