करमाळासोलापूर जिल्हा

खराब रस्त्यामुळे या भागातील एस टी सेवा बंद ; तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी

करमाळा समाचार – चिखलठाण (बातमीदार)

करमाळा तालुक्यातील जेऊर ते चिखलठाण या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून फारच खराब झाल्याने वाहतूकीसाठी अडचणींचा ठरत असून तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी या परिसरातील लोकांमधुन केली जात आहे.करमाळा तालुक्यातील पच्छिम भागातील वहातुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या रस्त्यावरून दरवर्षी दहा लाख टन उसाचे वाहतूक होते.

याशिवाय करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थान कडे जाणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी हा रस्ता फारच खराब झाला आहे या रस्त्याने वाहने चालवणे अवघड झाले असून अनेक दिवसांपासून मागणी करूनही या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने या परिसरातील लोकांना अनेक अडचणींना दररोज सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.

तालुक्यतील कुगाव,चिखलठाण नंबर एक व‌ चिखलठाण नंबर दोन, केडगाव, शेटफळ या गावाला जाणारा हा एकमेव रस्ता आहे सध्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असून खड्ड्यांमध्ये वाढत होत आहे चिखलठाण नंबर दोन व कुगाव या गावाला जाणारी एसटी बससेवा या खराब रस्त्यामुळे बंद केली आहे. दुचाकी वरून तर अक्षरशा जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ लोकांवर आले आहे.

जेऊर पासून चिखलठाण क्रमांक दोन पर्यंत जाणारा रस्ता गेले अनेक वर्षांपासून फारच खराब स्थितीत आहे लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे या भागातील लोकांना होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर या परिसरातील मतदारांनी बहिष्कार घालावा मतदारांच्या सामान्य गरजा पूर्ण होत नसतील तर लोकांनी मतदान का करावे.

– भाऊसाहेब शंकर सरडे, प्रगतशील शेतकरी चिखलठाण

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE