बारामती ॲग्रोने वारंवार याचिका दाखल केल्याने आदिनाथ सुरु होण्यास होतोय विलंब ; सहकार्याची अपेक्षा – डोंगरे
समाचार टीम
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळांनी ताबा घेतला असला तरी अजूनही अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक याचिका फेटल्यानंतरही बारामती ॲग्रो पुन्हा नव्याने याचिका करत असल्याने कारखाना सुरू होण्यासाठी अडचणी येत आहेत. तर त्यांनी आता तरी कारखान्याचे हित लक्षात घेऊन सहकार्य करावे. यावर्षीही कारखाना सुरू होण्यास अडचणी आणु नये असे आवाहन आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. तानाजी सावंत यांच्या सहकार्याने यंदा कारखाना तर सुरुच होणार हे नक्की पण न्यायालयीन लढाई लढायला बसायला वेळ कमी आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर हालचालींना वेग आल्यानंतर या ठिकाणी कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर नुकताच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याने आणखीन दोन कोटी सत्तर लाख रुपये भरल्यानंतर संचालक मंडळांनी रजिस्टर करून कारखाना ताब्यात घेतला आहे.

पण अद्यापही सर्व प्रकरण हे न्यायालयात चालूच असून यामध्ये एक डीआरटी, एक डी आर ए टी व हायकोर्ट अशा वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणांच्या सुनावण्या सुरू आहेत. मागील काही दिवसात बारामती ॲग्रो च्या वतीने हायकोर्टात दाखल केलेल्या तीन याचिकांपैकी दोन याचिका फेटाळल्या आहेत. तर तिसरी याचिकेला आता 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
याचिका फेटल्यानंतरही बारामती ऍग्रो पुन्हा एकदा याचिका दाखल करून वेळ खाऊ पणा करत आहे. यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी उशीर होऊ शकतो. कारखाना सुरू करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले असून त्यांच्या प्रयत्नातून कारखाना पुन्हा एकदा सुरू होत आहे. यापूर्वी नऊ कोटी रुपये तर आता दोन कोटी 70 लाख रुपये मंत्रीमोहदय डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिल्याने कारखाना सुरू होणार आहे. त्यांनी केलेल्या सर्व सहकार्याचं संचालक मंडळ सभासद कामगार हे कायम ऋणी राहतील असेही धनंजय डोंगरे म्हणाले.
तर कारखाना आता नव्याने बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांच्या विचाराने कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देणार आहोत असे आश्वासनही यावेळी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिले आहे. यावेळी ते मुंबईत संबंधित याचिकेच्या सुनावणी दरम्यान गेले असता त्यांनी फोनवरून करमाळा समाचार शी संपर्क साधून सदर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत संचालक लक्ष्मण गोडगे हे उपस्थित होते.