दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद घराचे कुलुप तोडुन साडे चार लाखाची चोरी
करमाळा समाचार
शेतात काम करणारे दांपत्य दुपारी जेवणासाठी आले असता चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटातील रोख 85 हजार 700 रुपयांसह चार लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपयाचे दागिने पळवल्याचे निदर्शनास आले आहे.

याप्रकरणी शेतकरी तुकाराम नवनाथ शिंदे वय 56 राहणार निंभोरे तालुका करमाळा यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घर फोडल्या आधी त्यांना निदर्शनास आले.

शिंदे दांपत्य शुक्रवारी सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून पाठीमागे शेतात कामावर गेले. त्यानंतर काही वेळाने पत्नी मनीषा परत घराकडे आली आणि म्हशीला पाणी पाजून परत शेतात कामावर आली. त्यानंतर दोघेही दुपारी घरी जेवायला आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि चोरट्याने घर फोडल्याचे लक्षात आले.
बाजूलाच दरवाजा कुलूप तोडून टाकलेला आणि घरातील साहित्य प्रास्ताव्यस्त टाकलेले दिसून आले. ते घरात डोकावले असता अर्धा तोळ्याच्या सहा अंगठ्या, एक तोळ्याचे दोन गंठण, सव्वा तोळ्याची बोरमाळ, सव्वा तोळ्याचे दोन नेकलेस, तीन ग्रॅमची कर्णफुले आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याचे स्पष्ट झाले.