आपण यांना ओळखता का ? – वृद्ध महिला रेल्वे अपघातात ठार ; कुटुंबीयाचा शोध सुरु
समाचार टीम –
मागील काही दिवसांपासून सोगाव पश्चिम परिसरात एक वृद्ध महिला फिरत होती. ती महिला अखेर दि २० रोजी रेल्वे च्या धडकेत मृत झाली आहे. सदर महिलेचे वय ५० ते ५५ असून तिझ्या परिवाराचा शोध गावातील काही युवक मंडळी सोशल माध्यमातून घेत होती. परंतु कुटुंबीय मिळून आले नव्हते. सदरची महिला ही भिल्ल समाजाची असल्याचे माहिती स्थानिकांनी दिली.

काही दिवसांपासून एक वृद्ध महिला सोगाव पश्चिम परिसरात फिरताना दिसून येत होती. त्या महिलेचे कुटुंबीय कोण आहेत याची माहिती घेण्यासाठी परिसरातील युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिलेचा फोटो व्हायरल करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण कुटुंबीय मिळून येत नव्हते.

गुरुवारी तीन वाजण्याच्या सुमारास पश्चिम सोगाव गावच्या शिवारात उजनी जलाशयाच्या रेल्वे लाईन वर बेवारस अवस्थेत संबंधित पन्नास वर्षाच्या वयोगटातील महिलेचे मृत शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. संबंधित माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तीला उपजिल्हा रुग्णालय येथे आणून शवविच्छेदन करण्यात आले. तर पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. त्याबाबत माहिती मिळाल्यास करमाळा पोलीस ठाणे क्रमांक ०२१८२२२०३३३ क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी केले आहे.