करमाळासोलापूर जिल्हा

अपुर्ण परवानग्यामुळे घरकुले रद्द होण्याची शक्यता ; उद्याच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने मध्ये 398 घरकुले मंजूर असताना केवळ 80 ला धारकांनी बांधकाम परवाने काढलेले आहेत. त्यामुळे तब्बल 318 घरकुले रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे उर्वरित 318 लाभधारकांनी आपले बांधकाम परवाने व इतर अडचणी दूर करून कागदपत्रे नगर परिषदेमध्ये जमा करावीत असे आवाहन मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केले आहे.

करमाळा नगरपरिषदे अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2018 पासून संबंधित योजनेत मंजूर असलेले घरे पूर्ण झालेली नाहीत. त्यासाठी तांत्रिक बाबींची तपासणी केली असता तब्बल ३१८ लोकांनी बांधकाम परवानाच काढला नसल्याने त्यांना सदरची सबसिडी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती शहरस्तरीय तांत्रिक सल्लागार संकल्प शहाणे यांनी दिली आहे.

यासंदर्भात लाभधारक व ज्यांना सबसिडीची रक्कम मिळत नाही अशा लोकांची बैठक बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास करमाळा येथील महादेव मंदिरासमोरील माजी आमदार जयवंतराव जगताप सभागृहात आयोजित केली आहे. या बैठकीला लाभधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना माहिती दिली जाणार आहे. जवळपास चार वर्ष रखडलेल्या या योजनेत ज्या लाभधारकांनी बांधकाम परवाना देऊ शकणार नाही अशांच्या घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे उपस्थित राहून अडचणी सांगाव्यात तसेच बांधकाम परवाना काढावा अशी आवाहन यावेळी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडून करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE