सावधान … बंद घराची होतेय रेकी ; घराच्या दरवाज्याची कडी तोडुन शिक्षकाच्या घरी चोरी
करमाळा समाचार
शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर पाहुण्यांच्या गावी गेलेल्या शिक्षक कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूवर साफ केला आहे. यावेळी त्यांनी ३२ हजार रुपयांचे साडेआठ ग्रॅम चे दागिने तर २८ हजार रोख रक्कम घेऊन पसार झाल्या आहेत. सदरचा प्रकार हा सोमवारी मध्यरात्री घढला आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सौदागर तरंगे रा. भालेवाडी ता. करमाळा यांनी याप्रकरणी करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे. फुलारी मळा येथे घोलप अपार्टमेंट मध्ये राहत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा देवीचा माळ रस्ता येथील परिसरात बाह्यवरण रस्त्यावर घोलप आपार्टमेंट येथे अनेक कुटुंब रहिवास करीत आहेत.
परंतु गावाबाहेरचा परिसर असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर शांतता असते. दिवसाही तिकडे जास्त गजबज नसते अशा परिस्थितीत मागील दहा दिवसापासून गावी गेलेले शिक्षक कुटुंबीय त्यांच्या घराचा बंद दरवाजा पाहिल्यानंतर त्या परिसरात आज्ञा चोरट्यांनी नजर ठेवून मध्यरात्री चोरी केली.
यामध्ये अर्धा तोळ्याचे अंगठी व साडेतीन ग्रॅमचे कानातील फुले असे एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल व घरात ठेवलेली २८ हजाराची रोख रक्कम असे दोन्ही मिळून घेऊन गेले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक श्रीकांत हराळे हे करीत आहेत.