करमाळासोलापूर जिल्हा

राजुरीत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन

करमाळा समाचार -संजय साखरे

राजुरी येथे दि.१ मे ते २३ मे या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य वारकरी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती या शिबिराचे आयोजक ह .भ .प किशोर महाराज जाधव राजुरीकर यांनी दिली आहे.

आजच्या संगणकीय युगात तरुण पिढीमध्ये धार्मिकता ,बालमनावर सुसंस्कार घडून पुढील पिढी संस्कारित व्हावी, त्याचबरोबर आपला धर्म आपली संस्कृती काय? आपला आचार -विचार कसा असावा हे कळणे काळाची गरज आहे हा मुख्य उद्देश ठेवून हे बालसंस्कार शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिराचा प्रारंभ एक मे रोजी सायंकाळी सहा वाजता ह. भ. प एकनाथ महाराज हांडे राजुरीकर, ह. भ .प संजयानंद झानपुरे महाराज साडे, ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज वाशिंबे यांच्या हस्ते होणार आहे. तर या शिबिराची सांगता २३ मे रोजी होणार आहे.

शिबिरामध्ये पहाटे पाच ते सहा मृदुंग सराव, सकाळी सहा ते सात योगासने, सात ते आठ दैनंदिन नित्यक्रम प्रार्थना, आठ ते नऊ नाश्ता, नऊ ते 11 मृदुंग व गीता क्लास, 11 ते 12 हरिपाठ पाठांतर, दुपारी बारा ते एक जेवण, एक ते तीन विश्रांती, त्यानंतर दुपारी तीन ते चार प्रवचन, चार ते सहा हरिपाठ, सायंकाळी सहा ते सात जेवण, नंतर सात ते नऊ व्याख्यान, भजन व कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राहणार आहेत.

या शिबिरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पांढरी टोपी पॅन्ट किंवा धोतर, नेहरू शर्ट ,टोपी ,उपरणे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक असून याचा परिसरातील बालमित्रांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक ह .भ .प किशोर महाराज जाधव राजुरीकर यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE