करमाळासोलापूर जिल्हा

वीज प्रश्न सुरु असलेल्या वेगळे वळण ; आधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

करमाळा समाचार 

करमाळ्यात वीजे संदर्भात सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनाला वेगळे वळण लागले असून रस्त्यावरच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे वाद वाढून त्या ठिकाणचे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

ViDeo- करमाळ्यात रस्ता रोको आंदोलनात दिग्विजय बागल आक्रमक … अटक करायची असेल्तर करा काहीही करा इथुन हलणार नाही अशी भुमीका.

पूर्व भागासह तालुक्यातील विजेच्या प्रश्नासाठी करमाळ्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली करमाळा बायपास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू होते. यावेळी भाषणे सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी व पोलिस एका बाजूला चर्चा करत असतानाच आंदोलन करते दिग्विजय बागल आक्रमक झाले.

बागल यांनीआम्ही या ठिकाणी कशासाठी आलोय आमच्या ऐकून घेणारे आम्हाला न्याय कोण देणार आहे अशा पद्धतीने आक्रमक होत सर्व अधिकाऱ्यांना घेराव घातला या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी सध्या आक्रमक आहेत व आंदोलन वेगळ्या दिशेने जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE