करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुकीत प्रा. झोळ सरांच्या सोबत शिंदे गटाची साथ ?

करमाळा समाचार

सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात पुढील रणनीती आखण्यासाठी विचारविनिमय बैठकीचे आयोजन दत्तकला शिक्षण संस्था इंदापूर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रा. रामदास झोळ यांनी आयोजीत केलेल्या या बैठकीला आदिनाथचे माजी अध्यक्ष व शिंदे गटाचे समर्थक नेते वामनदादा बदे हे उपस्थीत असल्याने आज पर्यत अलिप्त असलेला आमदार संजयमामा शिंदे गटाचा यात सहभाग दिसु लागला आहे. याबाबत अधिकृत माहीती नसली तरी उपस्थित नेत्यामुळे सगळ्याचर्चाना तोंड फुटले आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुरुवातीलाच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी प्रा. झोळ यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र उघडपणे आजपर्यंत भूमिका जाहीर केली नव्हती. दरम्यानच्या काळात सवितादेवी राजेभोसले यांनी बैठका घेत माजी आमदार नारायण आबा यांच्याशीही चर्चा विनिमय केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तरीही शिंदे गटाचा मात्र यात सहभाग दिसून येत नव्हता.

जवळपास छाननी पूर्ण झालेली आहे व बागल गटाची एक हाती सत्ता सध्या मकाई सहकारी साखर कारखान्यावर आल्यानंतर प्रा. झोळ व सवितादेवी राजेभोसले यांनी छाननी दरम्यान लागलेल्या निकाला विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितले आहेत. दरम्यान पुढील गणिती आखण्यासाठी प्रमुख नेत्यांसह पत्रकारांच्या उपस्थितीत इंदापूर येथे बैठक झाली. या बैठकीला आवर्जून वामनदादा मध्ये हे उपस्थित राहिल्याने शिंदे गटाचा पाठिंबा हा बागल विरोधी घटना मिळतोय का ? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे सदर बैठकीला राजेभोसले या किंवा त्यांचे सहकारी उपस्थित नव्हते. यावेळी लालासाहेब जगताप, माया झोळ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE