करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

महिलांची फसवणुक केल्याप्रकरणी भालेराव दांपत्यावर गुन्हा दाखल; बचत गटामुळे झाली ओळख

करमाळा समाचार

बचत गटाच्या माध्यमातून झालेली ओळख व विश्वास ठेवल्या नंतर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून कर्ज प्रकरण घेण्याचे व त्या वेळेत फेडतही होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळात महिलांना पैशाची गरज असल्याचे सांगून भालेराव दांपत्याने पैसे घेतल्याने त्यांचे हप्ते थकले व बँकेने संबंधित महिलांकडे तगादा लावला.

याबाबतची विचारणा महिलांनी भालेराव यांच्याकडे केल्यानंतर मी तुमचे पैसे देणार आहे कुठे जाणार नाही असे म्हणून वेळ मारून नेली. परंतु ज्यावेळी महिलांकडुन तगादा वाढला त्यावेळी मात्र भालेराव दाम्पत्य हे करमाळा शहरातून बाहेर गेले. त्यावेळी महिलांची फसवणूक झाल्याचे गोष्ट लक्षात आली. यानंतर सदरच्या महिलांनी करमाळा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

सावंत गल्ली येथील अश्विनी सावंत यांच्या तक्रारीवरून अश्विनी भालेराव व उदय भालेराव या दांपत्यांवर करमाळा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये सावंत यांच्या नावे 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले पण ते नियमित हप्त्यांनी फेडलं नाही. त्यामुळे सावंत यांच्या मागे बँकेने तगादा लावला. तर त्यांच्यासारखेच आणखीन पाच महिलांना अशाच पद्धतीने कर्ज मिळून त्यांच्याकडे उसने स्वरूपात घेऊन हप्त्याची परतफेड न केल्याने त्या इतर महिलाही अडचणीत आल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE