सोलापूर पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलाचा मार्ग मोकळा ; आ. संजयमामांच्या पाठपुराव्याला यश
करमाळा समाचार
ब्रिटिश कालीन कोंढार चिंचोली डिकसळ पुलाची निविदा अंतिम झाली आहे. आता या पुलाचा मार्ग मोकळा झाला असून बरेच दिवसापासून या भागातील नागरिकांची या पुलाच्या उभारण्यासाठी मागणी होती.

तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या पुलाला 50 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी मिळाली होती. दरम्यान कोरोनाच्या काळानंतर राज्यात सत्तातर झाल्यामुळे या निधीला स्थगिती मिळाली होती. परंतु आमदार संजयमामा शिंदे यांच्या सदस्य पाठपुरामुळे याला यश आले आहे.

बुधवार दिनांक 23 मे रोजी या पुलाची निविदा विजय पटेल कंपनी ला मिळाले असून 38 कोटी 66 लाख 31 हजार 470 रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे करमाळा आणि इंदापूर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे .