करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा अपहार ! दत्तात्रय जाधवांच्या सरपंच पत्नीसह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी – करमाळा समाचार

साडे ता. करमाळा येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना तत्कालीन सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव रा. साडे व राजेश सौदागर फरतडे यांनी अपहार केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरचे प्रकरण हे १ ऑगस्ट २०१५ ते २० एप्रिल २०२० या कालावधीत घडले आहे. यामध्ये तब्बल ७१ लाखांची अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनोजकुमार म्हेत्रे, (विस्तार अधिकारी पंचायत समिती तालुका करमाळा), यांनी फिर्याद दिली आहे. तर तत्कालीन ग्रामसेवक राजेश सौदागर फरतडे, रा. कव्हे ता माढा, 2) सौ. जयाबाई दत्तात्रय जाधव, रा. साडे ता करमाळा जि. सोलापुर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मौजे साडे ता. करमाळा ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच सौ. जयाबाई दत्तात्रय जाधव, रा. साडे व तात्कालीन ग्रामसेवक श्री. राजेश सौदागर फरतडे यांनी अर्थिक वर्ष सन 2015-2016 ते सन 2019-2020 या कालावधीमध्ये कार्यरत होते. त्यावेळी14 वा वित्त आयोगातुन मौजे साडे ग्रामपंचायतीस विकास कामांसाठी वरील कालावधीत प्राप्त रक्कम रूपये 95,99,102/- व सदर अनुदान रकमेवर रूपये 76848/- अशी एकूण रक्कम रूपये 96,75,950/- जमा होती.

सदर रक्कमेतून 71,42,395,50 /- रक्कम ही पंचायत समिती कार्यालय, करमाळा यांची पूर्वपरवानगी न घेता सदर निधीचे हिशोबाची किर्द सह इतर कागदपत्रे, शासकीय अभिलेख तपासणीस उपलब्ध करून न देता त्यांची संगणमताने स्वतःच्या फायदयाकरीता परस्पर विल्हेवाट लावून रक्कम रुपये 71, 42.395.50 चा अपहार केला आहे अशी तक्रार देण्यात आली होती.

याप्रकरणी मौजे साडे ग्रामपंचायतीचे तात्कालीन ग्रामसेवक राजेश सौदागर फरतडे व तात्कालीन सरपंच सौ जयाबाई जाधव रा. साडे विरुध्द सरकारतर्फे फिर्याद आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिसांचे आदेशाने सपोनि कुंजीर यांच्याकडे देण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE