करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुक्याची पहिली विधानसभा लढवणारे स्वातंत्र्य सैनिक चिवटे यांची पुण्यतिथी साजरी

करमाळा (प्रतिनिधी)


करमाळा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक साथी मनोहरपंत चिवटे यांची 41वी पुण्यतिथी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पंचवीस वर्षे पत्रकार म्हणून काम पाहत होते.

नागरिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून नगरपालिका निवडणुकीत 1952 थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. संयुक्त
महाराष्ट्र लढा चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र लढ्यात त्यांना सहा महिने जेल भोगावे लागली होती.

1951 देशात प्रथम निवडणुका झाल्या यावेळी झालेल्या बॉम्बे विधानसभा 154 करमाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत ढाल चिन्हावर चिवटे यांना 2701 मध्ये मिळाली होती. या निवडणूक या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कै. नामदेवराव जगताप यांना 9143 मते मिळाली होती.

तर शेतकरी कामगार पक्षाचे गणपती एकनाथ पाटील यांना 5290 मते मिळाली होती. या पहिल्या निवडणुकीत स्वर्गीय नामदेवराव जगताप 3853 मतांनी विजयी झाले होते. मांगी तलावाच्या भूमिपूजनासाठी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू करमाळ्यात आल्यानंतर त्यांचे प्रथम स्वागत नगराध्यक्ष म्हणून मनोहर चिवटे यांनी केले होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE