करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

अर्ज अवैध ठरवल्याने सात उमेदवार स्पर्धेबाहेर ; शिंदे गटात गेलेल्या वकीलांचा पाटील गटाकडुन यशस्वी युक्तीवाद

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीत निवडणुक जाहीर झालेली आहे. सरपंच पदाला १३५ व सदस्य पदासाठी ६२५ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये आज छाननीत डमी अर्जा शिवाय हरकती व कागदपत्रे अपुर्ण म्हणुन आठ अर्ज बाद करण्यात आले आहेत. दिवसभर जिंती आणी कामोणे येथील हरकतींवरील सुनावली उशीरा घेण्यात आल्याने नेमके त्या ठिकाणच्या उमेदवारांचे काय होतेय या कडे लक्ष लागले होते पण जिंती व कामोणे येथील हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

तीस ग्रामपंचायती मधुन एकुण २४४ सदस्य रिंगणात असणार आहेत. सोमवारी सकाळी पंचायत समीती हॉल मध्ये छाननीला सुरुवात झाली यावेळी जवळपास सर्व अर्ज छाननीत काहीच अडचणी आल्या नाहीत. तर कमी शिक्षणामुळे एक अर्ज अवैध तर इतर जातीचे दाखल्या संदर्भात पोहच नसणे व इतर कागदपत्रे नसल्याच्या कारणाने अवैध ठरवण्यात आले आहेत.

सातवी पास अपेक्षीत पात्रता असताना चौथी पास असलेले सोगाव येथील कावेरी नगरे या अवैध ठरवण्यात आल्या तर कोंढार चिंचोली येथील केशर लांडगे, पोफळज येथील प्रशांत गरड, देलवडी येथील अश्विनी चाकणे, कुंभारगाव येथील सिंधुताई पोळ, दिव्हेगव्हाण रेश्मा खाटमोडे, विहाळच्या पुजा मारकड यासर्वांचा अपुर्ण कागदपत्रे तर मोरवडचे सुमन नाळे यांचा एक अर्ज अवैध तर दुसरा वैध ठरवण्यात आला आहे.

जिंती व कामोणे येथील हरकतींसाठी संपुर्ण दिवस द्यावा लागला. जिंतीच्या प्रकरणात पतीच्या नावाने ठेका असल्याने हरकत घेतली होती. सुनावणी निवडणूक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष गोसावी यांच्या समोर झाली त्याचा निकाल उमेदवाराच्या बाजुने देत हरकत फेटाळली तर यावेळी हरकत घेण्याऱ्याच्या बाजुने ॲड. नितीनराजे भोसले तर उमेदवाराच्या बाजुने ॲड. अजित विघ्ने यांनी काम पाहिले निकाल विघ्नेंच्या बाजुने लागला.

विशेष म्हणजे विघ्ने हे राजकीयदृष्ट्या आमदार संजय शिंदे गटात आहेत त्यांचा हा निकाल माजी आमदार पाटील गटाला तसेच जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना दिलासा देणारा होता.

तर कामोणे येथे विरोधात उभा असलेल्या संपुर्ण आठ सदस्यांवर अतिक्रमणात राहत असल्याबाबत आक्षेप घेतला होता. त्याची सुनावणी श्री राजेंद्र राऊत यांच्या समोर झाली. वकील म्हणुन श्री कमलाकर वीर व ॲड. दिवाण वकील यांनी काम पाहिले. याप्रकरणात दोन्ही बाजु ऐकुन सर्व हरकती फेटाळल्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE