करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सुस्थितीत असलेली घसरगुंडी बागेतुन काढुन दुसरी कडे नेण्याचा डाव ? – स्थानिकांची नाराजी

करमाळा समाचार

कन्या शाळेजवळ असलेल्या नगर परिषदेच्या बागेतील घसरगुंडी व झोका चालू अवस्थेत होता. त्यावर रोज लहान मुले मौजमजा करत होते. तर ते घसरगुंडी व झोका ब्रेकरच्या साह्याने फोडून बाजूला काढून दुसरीकडे नेण्याचा प्रकार घडत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्या ठिकाणी बसवण्यात आलेली घसरगुंडी व झोका दुसरीकडे नेण्याचा किंवा बदलण्याचा अट्टाहास का होतोय ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

politics

नगरपरिषदेच्या वतीने प्रत्येक बागेमध्ये झोका घसरगुंडी खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले होते. परिसरातील लहान मुले व वृद्ध सदर बागेमध्ये जातात. त्या ठिकाणी लहान मुले घसरगुंडी व झोका व इतर साधनांचा वापर करतात. पण आता अचानकच कन्या प्रशाले जवळील बागेतील झोका व घसरगुंडी काढली जात असल्याने पुन्हा त्या ठिकाणी येईल का नाही किंवा ही नेमकी जाते कुठे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आहे ती घसरगुंडी आहे त्या ठिकाणी ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE