करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आमदार शिंदे समर्थक नेत्यामुळे एका केंद्रावर बागल विरोधी गटाला सन्मानजनक मताधिक्य

करमाळा समाचार

सध्या आजी माजी आमदारांनी सहकार्य केले नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे शिलेदार असलेल्या आदिनाथच्या माजी अध्यक्ष वामनदादा बदे यांनी ताकद लावल्याने व गणेश चौधरी जे त्या गावचे असल्याने फायदा झाला त्यामुळे विरोधी गटाला दिलासा मिळाला आहे. इतर ठिकाणी काही गावे वगळता सन्मानजनक आकडेही गाठता आले नाही हे यातुन दिसुन येते. तर पॅनल प्रमुखाच्या गावात तर अतिशय दैनी अवस्था 403 मतांपैकी केवळ 70 मतांवर समाधान. यामुळे नेमके कोणी काम केले आणि कोणी नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकत्याच झालेल्या मकाईच्या निवडणुकीमध्ये बागल विरोधी गटाचा दारुण पराभव झाला. यामध्ये उमेदवारांना केवळ आपले अनामत रक्कम वाचवता आली. एवढीच गोष्ट ती विरोधी गटाच्या बाजूने सकारात्मक झाल्याची दिसून येते. त्याशिवाय उमरड वगळता कोणत्याच गावातून त्यांना मताधिक्य मिळवता आलेली दिसून येत नाही.

मकाई सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला व वेगवेगळ्या गट व संघटना यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. परंतु त्या गटातटात पाहिजे तितका ताळमेळ दिसून येत नव्हता. ज्यावेळी अर्ज बाद झाले. त्यावेळेस मात्र विरोधी गटाने एकत्र येण्याचे ठरवले व पुढील निवडणूक चिन्ह असेल किंवा प्रचार व कोर्टात बाजू मांडणे यासाठी ते एकत्र दिसू लागले व त्यांच्यामध्ये बैठका होऊ लागल्या. त्यापूर्वी मात्र सदरचे गट हे वेगवेगळे असल्याचे दिसत होते.

अंतिम टप्प्यात निवडणूक आल्यानंतर यामध्ये संजय मामा शिंदे गटाचे कट्टर समर्थक आदिनाथ चे माजी अध्यक्ष वामनदादा बदे यांनी एंट्री घेतली व बागल विरोधी गटाला एक नवीन ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे उमरडसह पंचक्रोशीत दादांनी त्यांच्या अनुभवाचा वापर करीत मतदान गोळा करण्यास सुरुवात केली. स्थानिक उमेदवार तसेच दादांची साथ यामुळे केवळ उमरड या केंद्रातुन बागल विरोधी गटाला मताधिक्य मिळाल्याचे दिसून येत आहे.

उमरड केंद्रात येथे सुनीता गिरंजे 188, आप्पा जाधव 165, गणेश चौधरी 231, सुभाष शिंदे 190, महिला राखीव मध्ये सुनिता गिरंजे 192 इतकी मते मिळाली. ही मते बागल गटातील अजित झांजुर्णे 131, रामचंद्र हाके 126, रेवणनाथ निकत 134,संतोष पाटील 127, उत्तम पांढरे 108, दिनेश भांडवलकर 141, अमोल यादव 134, महिला राखीव मध्ये कोमल करगळ 145 व अश्विनी झोळ 132 यांच्यापेक्षा अधिक मिळवत जवळपास 50 मतांपेक्षा जास्त चे मताधिक्य केवळ एकाच केंद्रातुन मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे संजयमामा शिंदे गटाच्या एकाच शिलेदाराने काम चोख केल्याचे दिसते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE