आध्यात्मिककरमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सर्वात मोठ्या दिंडीचे उद्या तालुक्यात आगमन ; प्रशासनांचे नियोजन व संपुर्ण आढावा

करमाळा समाचार

श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज पायी दिंडी त्र्यंबकेश्वर हे सालाबाद प्रमाणे यंदाही सर्वात मोठी दिंडी उद्या करमाळा येथे पोहोचत आहे. रावगाव येथे या दिंडीचे स्वागत केले जाणार आहे. तर रावगाव येथे मुक्काम व गुरुवारी करमाळ्यात राशीन पेठ मध्ये सदर दिंडी येत आहे. पुढे तशीच दिंडी टेंभुर्णी मार्गे जाणार असल्याने रावगाव ते टेंभुर्णी पर्यंत चा मार्गावर प्रशासनाने जयत तयारी करून केली आहे. विसावा, मुक्काम ठिकाणशिवाय दिंडी मार्गावर पाणी व शौचालयाची सोय प्रत्येक ठिकठिकाणी केल्याचे माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

सदरच्या दिंडीमध्ये जवळपास 75 हजार लोक येणार असल्याचे पत्र प्रशासनाला दिंडी आयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने शिवाय पालकमंत्री विखे पाटील यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे मोठ्या दिंड्यांना ज्या सुविधा पुरवल्या जातात. त्या सुविधा यंदा निवृत्ती महाराज दिंडीला पुरवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांत माढा विभाग नामदेव टिळेकर, प्रांत करमाळा विभाग समाधान घुटुकडे, तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, महावितरण चे अभियंता सुमित जाधव, पोलिव निरिक्षक जोतीराम गुंजवटे आदींनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करून आढावा घेतला आहे.

मसाज मशीन दाखल ..
मसाज मशीन दाखल ..

उद्या दुपारी एकच्या सुमारास सदरची दिंडी ही कर्जत तालुक्यातील शेगुड इथपर्यंत येत आहे. त्यानंतर करमाळा तालुक्याची हद्द असलेल्या रायगाव मध्ये सदर दिंडीचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीने केले जाईल. त्यानंतर रायगाव मध्ये मुक्काम तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सदरची दिंडी करमाळा येथे राशीन पेठ मित्र मंडळ यांच्याकडे जेवणासाठी थांबणार आहे. त्यानंतर संध्याकाळी दिंडी पुढे जाईल व पुढचा मुक्काम हा जेऊर येथे होईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेलगाव (वांगी) या ठिकाणी दिंडी पोहोचेल नाष्टा झाल्यानंतर दिंडी पुढे जाईल ते कंदर मध्ये मुक्काम करेल अशा पद्धतीचे सर्व नियोजन आहे.

तर प्रशासनाच्या वतीने सर्व महिलांना स्नानगृह उभारण्याची सोय गावोगावी करण्यात आली आहे. तर महावितरणच्या वतीने सर्व दहा ते पंधरा ठिकाणी कर्मचारी उभा करून विजेची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर रस्त्यात असलेल्या पेट्रोल पंप धारकांना पाणी व सावलीसाठी मंडपाची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ग्रामपंचायतीने ही रस्त्यातील गावांना शेड व पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पंचायत समितीच्या वतीने ठिकठिकाणी मसाज च्या मशीन उपलब्ध केल्या तर आठ लोक त्यात मशाजही करणार आहेत. तर अनेक ठिकाणी झंडु बाम व आयोडेक्स चे वाटपही होणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE