करमाळ्यातील पन्नास जणांची चारधाम प्रवास, फसवणूक – गुन्हा दाखल
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील 50 यात्रेकरूंना चारधाम ची यात्रा करण्याच्या नावाखाली प्रत्येकी 25 हजार रुपयाप्रमाणे 12लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी चार जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या व्यक्तींनी सर्व प्रकार हा सर्व काही ठरवून केल्याचे चर्चा आहे. फसवणूक करण्यापूर्वी सर्व संशयित लोकांनी पोलीस तपास शिवाय शिक्षा या संदर्भात सर्व माहिती घेत जवळपास 12 लाख 50रुपयांची तालुक्यात तर इतर ठिकाणी वेगळीच फसवणूक केल्याची शक्यता आहे.

याप्रकरणी संकेत भडाळे, ऋषिकेश भडाळे, सुप्रिया भडाळे, सर्व रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदिर धायरी हवेली जिल्हा पुणे व बालाजी सूर्यवंशी रा. वडगाव बु ता. हवेली जिल्हा पुणे आशा चार संशयीत लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फेसबुकच्या माध्यमातून ड्रीम कास्टर टुर्स, शॉप नंबर 6 धायरी पुणे यांच्या संपर्कात करमाळ्यातील मंडळी आले होते. चार धाम यात्रेच्या अनुषंगाने त्यावेळी कंपनीशी बोलणे झाले. फेब्रुवारी 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात संकेत भडाळे, ऋषिकेश भडाळे , सुप्रिया भडाळे व बालाजी सूर्यवंशी हे करमाळा येथे आले होते. त्यांनी एकूण 50 लोकांकडून संपूर्ण माहिती घेतली. चार धाम करण्यावरून विश्वास संपादन करून घेतला.
सहलीमध्ये पुणे ते दिल्ली विमानाने जाण्याचा तेथून बसणे हरिद्वार व इतर ठिकाणी जायचे तसेच दिल्ली ते पुणे विमानाने प्रवास असे ठरले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून सर्व लोकांनी 25 हजार रुपये भरले होते असे एकूण साडेबारा लाख रुपये जमा झाले. परंतु नंतर काही दिवसांनी चारधाम यात्रा रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. परत पैसे मिळणार असल्याचेही कळवले होते. परंतु काही दिवसांनी पैसे देण्यास टाळा सुरू केली. यावरून फसाणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदारांनी करमाळा पोलीस स्टेशन गाठले त्या सर्वांची तक्रार केली.