आता ई प्रणाली व ई पिकपाहणीचा वापर करुन घरबसल्या अनेक कामे होणार ; चव्हाण महाविद्यालयात घुटुकडे यांचे मार्गदर्शन
करमाळा समाचार –
तुमची इच्छाशक्ती मोठ्याप्रमाणावर पाहिजे यात प्रवेश करतानाच भिती बाजुला ठेवत आपल्या मनाची तयारी करुनच या स्पर्धापरीक्षाच्या विषयात लक्ष द्यावे. यात जरी संघर्ष अधिक असला तरी आपली तयारी असेल तर यश नक्कीच मिळते. पण त्याला नुसती इच्छा असुन उपयोग नाही लढण्याची जिद्द पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आवर्जुन याकडे झुकलेले दिसतात आणि यशस्वी होतात असे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी केले. माध्यमिक मध्ये कमी गुण मिळवणारेही मोठे यश मिळऊ शकतात असेही घुटुकडे म्हणाले.

ते करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महसुल सप्ताह निमित्ताने आयोजीत स्पर्धा परिक्षांची तयारी या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य एल. बी. पाटील, प्रभारी तहसिलदार विजयकुमार जाधव, नहसुल नायब तहसिलदार शैलेश निकम आदिसह इतर अधिकारी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
पुढे बोलताना घुटुकडे म्हणाले , लग्न व इतर कारणांचे दाखले देत मुलींना त्यांच्या क्षमते पासुन रोखले जाते. पण सुरुवातीपासुन घरी आपण परिक्षेची तयारी करु शकण्याची जिद्द दाखवत कमी वयात जास्तीत जास्त मेहनत करा यश नक्की मिळणार आहे. तुम्ही कोणाची निवड होऊ नका तुम्ही कोणाची निवड करु शकला असे व्हा. याशिवाय आधार कार्ड, पिक पाहणी, ई पिकपाहणी, ई हक्क प्रणाली यामध्ये वारस नोंद बॅंक बोजा किंवा सात बारा चुका आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. घर बसल्या अर्ज करुन अपेक्षीत बदल होऊ शकतात अशीही माहीती दिली ऑनलाईन पध्दतीच्या सर्व बाबींची माहीती करुन घ्या तसेच मतदान नोंद्णी बाबत माहीती दिली. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थींची संख्या लक्षणीय होती.
