करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ज्यूनिअर कालेज टाकळी (रा) येथे “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा समाचार

‘महसूल सप्ताह’ अंतर्गत आज दि.02 ऑगस्ट रोजी त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्यूनिअर कालेज टाकळी (रा) येथे “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र कोकाटे होते.
‘युवा संवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंडळ अधिकारी जिंती संतोष गोसावी यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी महसूल विभाग,राज्यशासन,ग्रामप्रशासन या विभागाशी संबंधी विवीध प्रश्नांचे शंका समाधान करून घेतले.तलाठी भरती, राज्यसेवा परीक्षा,केंद्रीय लोकसेवा आयोग,पोलीस भरती,आरक्षण याबाबत विवीध प्रश्नांची उत्तरे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी दिली.

सर्व विद्यार्थी यांनी आपले घर व परिसरातील 18 वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तीची मतदार नोंदणी करणेबाबत जनजागृती करून नाव नोंदणी लोकशाही बळकट करण्यासाठी करावी असे आवाहन मंडळ अधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी तलाठी टाकळी (रा) रामेश्वर चंदेल,तलाठी जिंती प्रबुद्ध माने,सरपंच प्रतिनिधी सुखदेव दोडमिसे,डॉ.गोरख गुळवे,महा ई सेवा केंद्रचालक समाधान तानवडे,तसेच ज्यूनिअर काॅलेजचे शिक्षक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE