तो पुन्हा आलाय … पोथरे शिवारात बिबट्या ; सावध राहण्याचे आवाहन
करमाळा समाचार
मांगी येथील एक शेतकरी पोथरे शिवारात जात असताना त्याला बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आला आहे. त्याने त्याच्या मोबाईल मध्ये सदरची व्हिडिओ रेकॉर्ड केला असून जागरूकतेसाठी सर्वांना फॉरवर्ड केला आहे. तरी पोथरे व परिसरातील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

https://www.youtube.com/@DSPNEWS

या लिंक वर विडिओ उपलब्ध चॅनलला सबस्क्राईब करा …
मांगी येथून पोथरे येथे प्रकाश माळी हे रोज येजा करत असतात. आजही ते सायंकाळी सहाच्या सुमारास जात असताना त्यांना शेतामध्ये बिबट्या दिसून आला. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. सध्या तरी बिबट्याने कोणताही हल्ला कुठेही केल्याच्या बातम्या आल्या नसल्या तरी आपापली जनावरे व लहान मुले रात्री घराबाहेर नसतील किंवा विनाकारण कोणीही रात्री उशिरा बाहेर निघू नये असे आवाहन करण्यात येत आहे.