करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मकाई सहकारी साखर कारखान्यावर कारवाई ; झोळ सरांचे आरोप तर बागल गट आब्रूनुकसानीच्या तयारीत

करमाळा समाचार

 

 

थकबाकी प्रकरणी तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्यावर आर आर सी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना कारखान्याकडे लिलाव करण्याजोगी मालमत्ता उपलब्ध नसल्यामुळे कारखान्याच्या सातबारावर बोजा चढवला जात आहे. सध्या कारखान्याच्या तत्कालीन संचालकाची माहिती उपलब्ध न झाल्याने कारखान्यावर बोजा चढवला जात असल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी दिली आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ मधील एफआरपी थकवल्याप्रकरणी आरआरसी ची कारवाई केली जाणार होती. त्यामध्ये कारखान्यावर उपलब्ध साखरेचा निलाव करुन शेतकऱ्याची थकबाकी दिली जाणार अपेक्षित होते. परंतु कारखान्यावर लिलाव करण्यात केवळ दोन लाख ७५ हजार रुपयांची साखर शिल्लक आहे. पण देणे मात्र २६ कोटी ३२ लाख १८ हजार रुपये आहे. त्यामुळे त्या निलावातुन रक्कम देणे शक्य नसल्याने कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे.

या प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मकाई सहकारी साखर कारखान्यात साखर घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. कारखान्याची साखर चोरुन विक्री केली आहे असा आरोप करीत कारखान्याकडे साखर उपलब्ध नसताना ते थकबाकीची रक्कम कशी देणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी उपलब्ध केलेल्या पत्रांमध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालकांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात यावेत असे आदेश द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था (साखर)सोलापूर बी.यू. भोसले यांनी प्रादेशिक सहसंचालक सोलापूर विभाग यांना पत्राद्वारे कळविण्याची माहिती दिली.

ads

आरआरसी ची कारवाई महाराष्ट्रातील एफ आर पी न दिलेल्या प्रत्येक कारखान्यावर सदरची कारवाई होत आहे. तर मकाई कारखान्याची साखरही केंद्र सरकार व राज्याच्या नियमानुसार विक्री करून मागील आणि चालू वर्षाची सभासदांची देणे दिली. सदरची देणे देताना स्वतः कारखान्याने कोणतेही कर्ज कोणत्याही बँकेकडून न घेता ही सर्व देणी दिली गेली. याच खरंतर कौतुक करणे गरजेचे असताना देखील शेतकरी सभासदाला अडचणीत आणणे आणि मुद्दामुन कारखान्याची बदनामी करणे या करता बेछुट आरोप करून आता कर्ज प्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकांचे आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी मात्र आम्ही अशा बेछुट आरोपांना आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करूनच उत्तर देऊ असे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आज स्पष्ट केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE