करमाळासोलापूर जिल्हा

युवा नेत्याने आ. संजयमामांना निवेदन देऊन मागणी करताच दखल ; मुस्लिम समाजाला मिळणार दिलासा

करमाळा समाचार 

 

सध्या चालू असलेल्या इस्लाम धर्मातील पवित्र महिना रमजान सुरु असल्यामुळे या महिन्यामध्ये मुस्लिमासह इतर समाजातील सर्व स्तरातील लोक उपवास धरतात. त्यामध्ये त्यांना पहाटे सहेरी करण्यासाठी आणि संध्याकाळी इप्तार करण्यासाठी दुध, फळे, भाजीपाला इतत्यादीची आवश्यकता असते.

अशा परीस्थिती मध्ये सोलापूर जिल्हयात ८ मे पासून लावण्यात येणारा कडक लाॅकडाऊन मध्ये दुध, फळे, भाजीपाला व किराणामाल यांना सवलत द्यावी किंवा लाँकडाउन १५ मे नंतर जाहीर करावे. जेणेकरून सोलापूर जिल्हा वासियांची गैरसोय होणार नाही असे निवेदन आज करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांना युवा नेते आशपाक जमादार, जमियत उलमा-ए-हिंदचे सदर मौ.मोहसीन शेख, कय्युम शेख, सामाजिक कार्यकर्ते विशाल कुभांर व इतर कार्यकर्ते यांनी दिले. अशपाक जमादार हे सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे मुस्लिम समाजाला दिलासा मिळेल.

निवेदन देताच आमदार शिंदे यांनी ते पत्र वाचले आणि तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करुन या विषयावर सविस्तर चर्चा केली. या सकारात्मक चर्चेतुन दोन दिवसांची सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये येणाऱ्या रमजान ईद व अक्षयतृतीया च्या अनुषंगाने ११-१२ तारखेला जनतेला थोडी मिळण्याची शक्यता आहे तर चर्चेतुन असा निष्कर्ष निघाल्याचे आ. शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

सध्या करोनाच जोर वाढत आहे. पण मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करता सण साजरा होणे ही गरजेचे आहे. समाजाने कायम शासनाला व प्रशासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढे ही सवलत मिळाली तरी नियमांची अंमलबजावणी करूनच सण साजरा केला जाईल. याची आम्ही ही दक्षता घेतो आमच्यासाठी मामांनी लगेचच वरिष्ठ पातळीवरून हालचाली केल्या मुळे हे शक्य होऊ शकले त्यामुळे दोन्ही मामांचे धन्यवाद

– अशपाक जमादार, युवक नेते

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE