करमाळ्यात तहसिलदार म्हणून महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत ; त्यांची लेडी सिंघम म्हणुन ओळख
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील तहसीलदारपद बऱ्याच दिवसांपासून रिक्त असल्याने त्यांच्या जागी नायब तहसीलदार यांच्याकडे प्रभारी पदभार दिला आहे. तर रोजच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांची करमाळा येथे नियुक्ती होईल अशा चर्चा रंगवल्या जात आहेत. बऱ्याच दिवसापासून असेच एक नाव चर्चेत आहे ते शिल्पा ठोकडे यांचं त्या लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल किंवा नाही पण त्यांची कारकीर्द उल्लेखनीय असल्याने त्यांच्या बाबत आढावा घेतला असता असा अधिकारी तालुक्याला मिळावा असे प्रत्येकाला वाटेल.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे एका सामान्य कुटुंबात शिल्पा ठोकडे यांचा जन्म झाला. घर आणि शेतीची काम करणाऱ्या शिल्पा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. 1997-98 मध्ये शिल्पा ठोकडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ते पोलीस खात्यात फौजदार पदी नियुक्त झाल्या. पोलीस खात्यापेक्षा महसूल त्यांना अधिक महत्त्वाचा वाटलं त्यामुळे त्यांनी पुनश्च्य स्पर्धा परीक्षा दिली व त्या उत्तीर्ण झाल्यामुळे 2003 मध्ये त्यांची नियुक्ती नायब तहसीलदार पदी झाली.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून यशस्वी काम केल्यानंतर 2012 मध्ये शिल्पा ठोकडे यांची दक्षिण सोलापूर मध्ये तहसीलदार पदी नियुक्त करण्यात आली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आपल्या कार्यकाळात शासनाच्या समाधान योजनेसाठी उभारलेल्या मंडपातच अनाथ मागासवर्गीय मुलीच्या लग्नाची जबाबदारी कोणीही घेत नाही हे निदर्शनास येतात पुढाकार घेऊन शासकीय कार्यक्रमातच त्या अनाथ मागासवर्गीय मुला मुलींचे लग्न थाटात करून दिली. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथे त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी दाखले मोफत मोफत वाटप करीत 18 गाव दाखले मुक्त केली. सहा गावातील प्रश्न सोडवून हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिला.
दक्षिण सोलापूर हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेला तालुका. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंडगिरी, वाळू तस्करी त्यांच्या निदर्शनास आली होती. वाळू तस्करांना कायद्याची भीती नव्हती. त्यावेळी वाळू तस्करांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शिल्पा ठोकडे यांनी तीन वर्षाच्या काळात 600 पेक्षा अधिक बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या मोटारी पकडल्या. 150 गाड्यांवर गुन्हे दाखल केले त्यातून 60 लाखांचा दंड वसूल केला. वाळू उपसा करण्यासाठी वापरात येणाऱ्या नदीच्या पात्रातील बोटीने जप्त केल्या. प्रसंगी अशा बोटी जाळूनही टाकल्या.
चित्रपटांना शोभतील अशा पाठलागाच्या घटनाही त्यांच्या आयुष्यात घडल्या. रात्री अपरात्री होणाऱ्या अशा कारवाईच्या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना नदीपात्रात अगदी कर्नाटक हद्दीपर्यंत पोहोत जावं लागलं पण त्या डगमगलं नाहीत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला जेव्हा आपला पाठलाग करण्यात येत असल्याचे निदर्शनाला येत असेल तेव्हा तो वाहन चालक रस्त्यातच मोटर सोडून पळून जात असे प्रसंगी आणि स्वतः सोडून दिलेल्या मालमत्ता घेऊन ती गाडी पोलीस ठाण्यापर्यंत आणलेली आहे अशा या महिला अधिकारी गुन्हेगार व माफियांचा कर्दनकाळ ठरतात. आपल्या मुळगावाच्या शेजारी त्यांची बदली होऊन त्यांना इथे काम करण्याची संधी मिळेल का ? मिळाली तर ते मुक्तपणे काम करुन आपली कामाची तीच पद्धत तशीच चालु ठेवतील का ? याकडे लक्ष लागुन राहिल. त्यांच्या कार्यास शुभेच्छा.