मराठ्यांच्या आंदोलनाला हॉटेल असोसिएशनचा पाठिंबा
करमाळा समाचार
सकल मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी बाबत घेतलेल्या निर्णयाला हॉटेल असोसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच साखळी उपोषणास हॉटेल व मिठाई व्यापारी असोसिएशनने पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल, उपाध्यक्ष आनंद राखुंडे, सचिव सुशील राठोड, अक्षय चिवटे, हेमंत कांबळे, हेतल वासवानी, रोहित वळेकर,सुशील राठोड, अकबर सय्यद, शिवकुमार चिवटे, गणेश श्रीवास्तव, संदीप चुंग, अमोल मोरे, गणेश ममदापूरे, अतुल फंड, तेजस मल्होत्रा, उमेश विटुकडे, यशोदिप किरवे, ओम चिवटे, मंगेश बागडे, संतोष वारे, अविनाश राठोड, धीरज कुमार शेट्टी आदींनी सदरच्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
