करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच गावातील पंधरांना चावले ; सोलापूरात उपचार

करमाळा समाचार –

करमाळा तालुक्यातील बाळेवाडी येथे पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हैदोस घातला असून गावातील वृद्धांसह १४ ते १५ जणांना चावा घेतला आहे. एकाच वेळी एवढ्या जणांना चावा घेण्याचा हा पहिलाच प्रकार असून सर्वांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

करमाळा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. सदरची कुत्रे हे पाठलाग करून गाडीवरून अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याशिवाय लहान मुलांसह मोठ्या माणसांनाही चावा घेण्याची भीती असल्याने त्यांचा धोका वाढला आहे. याबाबतच्या बऱ्याच वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. शहरात तर याबाबतची लसीकरण करण्यात आले होते. परंतु ते लसीकरण केले तरी चावल्यानंतर त्यावर उपाय म्हणून लसीकरणाचा उपयोग होतो. परंतु जाऊ नये किंवा पाठलाग करू नये यासाठी कोणतेही उपाययोजना त्यामध्ये नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

चंद्रकांत नलावडे (वय५६), नवनाथ मिसाळ (वय ६७),अंकुश मिसाळ (वय ४०) पुतळाबाई मिसाळ (वय ५०), अधिकबाई निकाळजे ( वय ८०), नंदा लोंढे (वय ५३), मंदा नलवडे (वय ५३), दिलीप शिंदे (वय ५०), हनुमंत नलावडे (वय ५०), राजेंद्र मिसाळ (वय ५०) आदिंची नोंद उपजिल्हा रुग्णालयात आहे. यांना पुढील उपचारासाठी पुढे पाठवले आहे. दोन ते तीन जणांना गंभीर जखमा आहेत तर इतरांना किरकोळ जखमा आहेत.

अधिकारी म्हणाले ..
सदरच्या रुग्णांना करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर प्राथमिक तपासणी केली असता सदरचा चावा हा पिसाळलेला कुत्र्याचा असल्याची माहिती मिळाल्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना लसीकरण केले आहे. तर पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
– गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE