करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मराठा समाजाच्या आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा

करमाळा समाचार

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवली सराटी येथे श्री मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांना सक्रिय पाठिंबा म्हणून करमाळा तालुका सकल मराठा बांधव साखळी उपोषणाला बसले आहे. या आंदोलनासाठी बळ मिळण्यासाठी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

यावेळी तात्यासाहेब जाधव, अरुण चौगुले, अजित कणसे, दत्तात्रय जाधव, शहाजी रणदिवे, लक्ष्मण भंडारे, रमाकांत गटकळ, श्रीकांत मोरे, पोपट पाटील, महेंद्र शिंदे, राजाराम ननवरे, शिवाजी लोकरे, शिवाजी फरतडे, गणेश आडेकर, रघुनाथ फडतरे, प्रताप भोसले, आबा बागल, लहू जाधव, सुनील पवार, अनिल यादव, नारायण डवले, दादा सोरटे, अंकुश सुरवसे, बबन रोडे, बाळासाहेब गोरे, सचिन चेंडगे, महेश निकत, अशोक कणसे, गणेश देवकर, नाना वारे, शिवलाल शिंदे, सतीश वारे आदी शिक्षकांच्या सह्या आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE