करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा ; तर आवताडेंचा नेत्यांना इशारा

करमाळा समाचार

मनोज जरंगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे सध्या मराठा समाज आक्रमकतेच्या दिशेने वळत आहे. अशातच भोसे येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बागडे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सदरचा राजीनामा त्यांनी संबंधित यंत्रणेकड पोहच केला आहे. तर याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्या हाती सोपवले आहे.

Live:

https://www.youtube.com/live/BqllTDNHf7o?si=yhC9-VW6KArngolV

उपोषणाच्या आठव्या दिवशी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. मराठ्यांचा सरकारने अंत पाहू नये. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. वेळीच या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी काम करावे अन्यथा खुर्च्या खाली कराव्यात असे आवाहन सकल मराठा कार्यकर्ते भारत आवताडे यांनी केले आहे. आज करमाळा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या सातव्या दिवशी ते उपस्थित होते व उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत होते.

तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित भारुड व गाण्यांचा माध्यमातून इतिहास मांडला जात आहे. त्यावेळी भोसे येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बागडे यांनी या ठिकाणी येऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE