करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कामानिमित्त पुण्याकडे जात असताना रेल्वेतुन पडल्याने युवकाचा मृत्यू

करमाळा समाचार

तो काही मित्रांसोबत कामानिमित्त महाराष्ट्रात आला होता. ओडिसा येथून पुणे येथे कामासाठी जात असताना रेल्वे गाडीतून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात जेऊरवाडी ता. करमाळा परिसरात रात्रीच्या वेळी घडला आहे. सकाळी साडेदहाच्या दरम्यान स्टेशन मास्तर यांनी करमाळा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. या अपघातात टिपून बेहेरा वय २४ हा मयत झाला आहे.

बुधवार दि १३ रोजी आपल्या मित्रांसह टिपून बेहेरा हा पुण्याच्या दिशेने भुवनेश्वर ते पुणे एक्सप्रेस या गाडीमधून प्रवास करत असताना मध्यरात्री दरवाजाजवळ आला असता तोल जाऊन तो गाडीतून बाहेर पडला असल्याचा संशय आहे. सदर प्रकाराबाबत माहिती उशिरा मिळाली.

यावेळी करमाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व सदरचे मृत शरीर करमाळा येथे शवविच्छेदनासाठी आणले होते. याबाबतची करमाळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. गोरे हे करीत आहेत.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE