करमाळासोलापूर जिल्हा

अपघातानंतर उस वाहतुक करणाऱ्या टॅक्टर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यु ; ट्रक चालकावर गुन्हा

करमाळा समाचार

ऊस वाहतूक करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर चालकाला कोर्टी कडून करमाळ्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक ने चोराची धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर जवळपास तेरा दिवस उपचार सुरू होते. अखेर त्याचा पुणे येथील सुसन रुग्णालयात मृत्यू झाला. सदरचा अपघात ३१ ऑक्टोंबर २२ रोजी विहाळ ता. करमाळा येथे घडला होता. तर त्याचा मृत्यू १३ नोव्हेंबर २२ रोजी पुणे येथे झाला. तर अनोळखी चालकावर ११ डिसेंबर रोजी करमाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या अपघातात हिरामण मोहन भोई (वय ३५) रा. पिंपरी ता. इंदापूर जि. पुणे सध्या आलेश्वर ता. परांडा जि. उस्मानाबाद असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यासोबत ऊस वाहतूक करणाऱ्या दुसऱा ट्रॅक्टर चालक लखन नागटिळक रा. वडशिवणे ता. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विहाळ ता. करमाळा येथील भैरवनाथ शुगर या कारखान्यावर हिरामण भोई व लखन नागटिळक हे ऊस टाकण्यासाठी गेले होते. ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी त्या ठिकाणी दोघेही रांगेत उभा होते.

रात्री साडेअकराच्या सुमारास हिरामण भोई यांच्या ट्रॅक्टरचा नंबर आल्याने त्यांनी ऊस घालून कोर्टी करमाळा रस्त्याला ट्रॅक्टर उभा करून थांबले होते. यावेळी भोई हे ट्रॅक्टर मधून खाली उतरले. दरम्यान कोर्टीगावाहून एक वेगवान ट्रक रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता करमळ्याच्या दिशेने जात होता. त्या ट्रकने हिरामण भोई यांना जोराची धडक दिल्याने भोई हे गंभीर जखमी झाले. ती वेळ रात्री दोन वाजण्याची होती.

त्यानंतर त्यांना पुणे येथील सुसन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास भोई यांचा मृत्यू झाला. सदरची माहिती नागटिळक यांना कळाल्यानंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. यावरून अनोळखी ट्रकचालकाच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE