माढासकारात्मकसामाजिक

कुर्डूवाडी चे सामाजिक कार्यकर्ते बालाजी लुक्कड माणुसकी भूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी कुर्डुवाडी

येथील सामाजिक कार्यात तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे तसेच विविध समाजसेवेत अग्रेसर असलेले बालाजी लुक्कड यांना माणुसकी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मलकापूर बुलढाणा येथील माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन मलकापूर यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उललेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा माणुसकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

यावर्षी गेली पंधरा वर्षे चतुर्थी उपक्रमाच्या माध्यमातून अनाथ बालकांची व प्राण्यांची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते बालाजी पोपटलाल लुक्कड यांना विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भीमराव वानखेडे व पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर व अँडव्होकेट नितिन जाधव यांच्या शुभहस्ते माणुसकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मुर्तीचीन्ह, सन्मानपत्र , शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विवेक राजापुरे, ऋषिकेश जोशी क्षीरसागर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE