करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा पोलिसांची धमाकेदार कामगिरी ; डिजेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

करमाळा समाचार – विशाल घोलप

अहमदनगर ते करमाळा रस्त्यालगत थांबलेल्या कंटेनर मधून डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात करमाळा पोलिसाना यश आला आहे. याबाबत करमाळ्यात गुन्हा दाखल झाला होता. तात्काळ पोलिसांनी तपास करत संबंधित त्याला अटक केली.

19 मार्च रोजी रात्रीची वेळी अहमदनगर ते करमाळा रोड लगत थांबलेल्या कंटेनर मधील डिझेलची चोरी झाल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. सदरची टोळी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपास केला असता संशयीतांचा शोध घेतला.

त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस पथकाला गुंगारा देऊन पळून जात असताना एकास करमाळा पोलिसांनी पकडले आहे. अनिल सुभाष पवार रा. मांडवा ता. वाशी जिल्हा धाराशिव असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 45 लिटर, डिझेल भरण्याची प्लास्टिक कॅन, बांगडी पाईप तसेच डिझेलची टाकी फोडण्याचे हत्यार सह एक स्कॉर्पिओ गाडी पाच लाख 54 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

ads

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक माहुरकर, हवालदार अझर शेख, बालाजी घोरपडे, राजेश रोडगे, चंद्रकांत ढवळे, सोमनाथ जगताप, जालिंदर गोरे यांच्या पथकाने केले आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE