करमाळाताज्या घडामोडीमाढामाळशिरसराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोहिते पाटील समर्थकांकडुन ‘तुतारी’ चे संकेत ; विजयदादांचा तुतारी सोबत विडिओ व्हायरल

करमाळा समाचार – विशाल घोलप

 

मागील काही दिवसापासून माढ्याचा तिढा वाढत चालला असून धैर्यशील मोहिते पाटील, रासपाचे महादेव जानकर, अभयसिंह जगताप तसेच इतर नेत्यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. पण मोहितेंनी दौरे सुरु केले तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही तर जानकर व पवार यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. दरम्यान भाजपाला पराभूत करण्यासाठी आपण स्वतः उमेदवार असु किंवा ज्या जो उमेदवार देईल त्याचे काम करू अशी भूमिका अभयसिंह जगताप यांनी घेतली आहे. तर मोहिते पाटलांची भुमीकेची उत्सुकता लागली असली तरी करमाळ्यातील कार्यकर्त्यांकडून तुतारी सोबत जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातून शरद पवार यांच्या तुतारीचा जोर वाढत चालला आहे. ज्या पद्धतीने पवार यांना सोडून सर्व नेतेमंडळी गेले त्यामुळे अधिकच सहानुभूती पवार यांना मिळाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे सध्या नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना त्यांच्या समर्थकांकडून पवार यांच्या राष्ट्रवादी मधून उभारण्याची विनंती केली जात आहे. तर त्यांच्या तुतारी या चिन्हावर उभा राहावे अशा विनवण्या सुरू आहेत. मोहिते पाटील कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते विजयदादा हे एका कार्यक्रमात गेले असता त्यांच्यासमोर तुतारी वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या मोहिते समर्थकांकडून व्हायरल केले जात आहेत. यातून त्यांच्या मनात काय चालले आहे याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सध्या धैर्यशील मोहिते पाटील व परिवारातील सदस्यांनी करमाळा तालुक्यात व माढा लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. यावेळीही कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून तुतारीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोहिते हे तुतारी हातात घेतील असे संकेत मिळू लागले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE