बागल लगेचच ॲक्टीव मोडवर ; वाशिंबे येथे कार्यकर्त्यांच्या भेटीला
करमाळा समाचार
मतदाना नंतर लगेचच बागल गटाचे नेते ॲक्टिव मोडवर आल्याचे दिसत आहेत. भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर नव्याने पुन्हा सुरुवात केल्याची दिसुन येत आहे. मकाई सहकारी साखर कारखाना मा.चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज वाशिंबे येथे भेट दिली. यावेळी तालुक्यातील पश्चिम भागातील विविध विषयांवर चर्चा झाली.

वाशिंबे ता. करमाळा येथे रश्मी बागल यांच्या प्रयत्नातून नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी चार एकर गायरान जमिन जागा हस्तांतरण प्रक्रीया तसेच नव्याने होत असलेल्या रेल्वे भूयारी मार्गाबाबतचा आढावा यावेळी घेतला. तसेच डीकसळ पूल परिसरात बूडीत बंधारा बांधणे व वाशिंबे-गोयेगाव ते आगोती दरम्यान भीमा नदी वर पूल बांधने तसेच तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगितले.
