करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुख : द घटना – कोमोणे फाट्यावरील अपघातात करमाळ्याच्या आठ महिन्यांच्या गर्भवती मृत्यू

करमाळा समाचार

आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीला सोबत घेऊन मोटरसायकलवर येत असताना पाठीमागून माल ट्रकने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या पती-पत्नी पैकी गरोदर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता असे बोलले जात आहे. परंतु करमाळा व बार्शी येथे दोन्हीकडे उपचारात विलंब झाला. त्यामुळे आईसह गर्भातील बाळही दगावले आहे. आईसह गर्भातील बाळ दगावल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरचा अपघात दि. ११ रोजी अहमदनगर करमाळा मार्गावर कामोणे फाटा येथे घडला आहे.

सोनाली पंकज कांबळे (वय १९) भीम नगर ता. करमाळा असे मयत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात पंकज कांबळे हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोनाली आपल्या माहेरी गेली होती. तर तिला माघारी करमाळा येथे आणण्यासाठी पंकज गेला होता. त्यानंतर दोघेही मोटरसायकल (क्रमांक एम एच १६ डीएफ १८५०) यावर दि ११ रोजी सकाळी करमाळ्याचे दिशेने निघाले होते.

दरम्यान अहमदनगर करमाळा मार्गावर कामोने फाटा येथे सकाळी ११ च्या सुमारास पोहोचल्यानंतर पाठीमागून येत असलेल्या माल ट्रक (क्रमांक टी.एन. ५२ एम ३४६९) च्या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही शिवाय गाडीवर ताबाही राहिला नाही. समोर असलेल्या मोटर सायकलला पाठीमागून धडक दिली. यावेळी मोटर सायकल रस्त्याच्या खाली जाऊन पडली. यावेळी आठ महिन्यांची गर्भवती सोनाली गंभीर जखमी झाली. तिला करमाळा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करत असताना गर्भवती असल्याने पुढील उपचारासाठी बार्शी येथे पाठवण्यात आले.

करमाळा व बार्शी या ठिकाणी अधिकचा काळ गेल्यामुळे तिला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले होते. तर वाहनांच्या रांगांमुळे बराच काळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती. घटनास्थळावर गेल्यानंतर करमाळा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE