करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरमाढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिंदे बंधुंच्या बालेकिल्ल्यातुन मोहितेंना अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य ; मतदारसंघनिहाय आकडेवारी

करमाळा समाचार

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख वीस हजार मतांची आघाडी घेत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला आहे. यात माळशिरस नंतर करमाळा व माढ्याची महत्त्वाची साथ मोहितेंना मिळाली.

लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदारसंघ आमदार बबनराव शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोहिते पाटील यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख 22 हजार 570 तर रणजीतसिंह निंबाळकरांना 70 हजार 55 या मते मिळाली आहेत. त्यामुळे माढ्यातून 52515 मताधिक्य मोहितेंना मिळाले. या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे महायुतीला लीड मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे.

politics

माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहितेंची नाराजी भाजपला भारी पडली. या ठिकाणी मोहिते एक लाख 34 हजार 279 तर निंबाळकर 64 हजार 145 मते मिळाली आहेत. मोहिते पाटील यांना 70 हजार 134 मताधिक्य मिळाल्याने ताकद मिळाली. या ठिकाणी मोहितेंना उत्तमराव जानकर यांची साथ मिळाली.

करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह इतर गटांची साथ मिळालल्याने मोहिते यांना मताधिक्य वाढल्याचे दिसून आले. 97 हजार 469 मोहिते यांना तर 55 हजार 958 निंबाळकर यांना मते मिळाली आहे यामुळे करमाळ्यातून जवळपास 41 हजार 511 चे मताधिक्य मोहिते यांना मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी व अजित पवार गटाचे निकटवर्तीय आमदार हे मामा शिंदे व भाजपाच्या रश्मी बागल यांचा प्रभाव कमी पडल्याचे दिसुन आले.

सांगोला, माण व फलटण या ठिकाणी मात्र थोड्या प्रमाणात का होईना मताधिक्क मिळवण्यात रणजीतसिंह निंबाळकर यांना यश आल्याचे दिसून आले. सांगोला येथील पाणी प्रश्नावरील कामांमुळे निंबाळकरांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी धैर्यशील मोहिते यांना 84 हजार 556 तर रणजीत नाईक निंबाळकर यांना 89 हजार 38 इतकी मते मिळाली आहेत. या ठिकाणी नाईक निंबाळकर यांना 4482 मताधिक्य मिळाले आहे. पाणी प्रश्नासोबतच आमदार शहाजी पाटलांची ही मदत या ठिकाणी निंबाळकरांना होताना दिसली.

माण विधानसभा मतदारसंघांमध्ये निंबाळकर यांचे प्रचार प्रमुख असलेले आमदार जयकुमार यांचा हा मतदार संघ असल्याने फायदा झाला. आमदार गोरे यांचे भक्कम साथ प्रभावी प्रचारामुळे निंबाळकर यांना लाखाच्या पुढे मतदान मिळवता आले. या ठिकाणी धैर्यशील मोहिते यांना 86 हजार 59 तर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख 9414 मध्ये मिळाले आहेत. निंबाळकर यांना माण मधून 23 हजार 355 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

तर फलटण मध्ये स्थानिक असल्याचा फायदा निंबाळकर यांना दिसून आला. पण ज्या पद्धतीने मोहितेंचा बालेकिल्ल्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळून दाखवले त्या पद्धतीने निंबाळकरांनी स्वतःच्या तालुक्यात अपेक्षित असे मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले नाही. या ठिकाणी मोहिते यांना 93 हजार 633 तर निंबाळकर यांना एक लाख दहा हजार 561 मध्ये मिळाले आहे. या ठिकाणी स्वतःचा तालुका असतानाही निंबाळकरांना केवळ 16928 मताधिक्य मिळाले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE