करमाळासोलापूर जिल्हा

वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ; शोध मोहिम अविरत चालवणे गरजेचे

करमाळा समाचार 

तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जीवघेणे तीन हल्ले झाल्यानंतरही अजूनही बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले नाही. तर काल सांगवी क्रमांक 3 या गावात बिबट्याला घेरण्यात आले होते. पण रात्री बारानंतर ही मोहीम थांबवण्यात आली व शुक्रवारी पुन्हा आठ वाजले पासून शोध मोहीम सुरू केली जाणार आहे. पण रात्रीत हा बिबट्या त्या ठिकाणाहून निघून गेला असेल तर आता सापडणार कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरू केलेली मोहीम बिबट्या सापडेपर्यंत थांबवणे चुकीचे होते असे आता वाटू लागले आहे.

तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून रोजच कुठे ना कुठे बिबट्याचे पावलाचे ठसे तर हल्ला झाल्याचे चर्चा ऐकू येत आहेत. तर सांगवी परिसरात ठसे व बिबट्या दोन्हीही आढळल्यानंतर त्याठिकाणी मोहन पाटील यांच्यावर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला होता. तर पाटील यांनी त्यांच्यावर दगड भिरकावत त्याला त्या ठिकाणाहून पळून लावले. तर तो शेजारीच दुसऱ्या शेतात गेल्याचे सर्वांनी पाहिले होते. यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावले व पावलांचे ठसे पाहिल्यानंतर ते बिबट्याचे असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी घेराव घालण्यात आला होता.

तर बिबट्या आतच असल्याबाबत शहानिशा झाल्यानंतर मोहीम तीव्र करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत सर्व अधिकारी चाणाक्ष पद्धतीने त्या बिबट्यावर लक्ष ठेवून होते. तसेच कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनीही रात्री त्या ठिकाणी भेट दिली पाहणी केली. गुरुवारी रात्री बिबट्याच्या फडशा नक्की असताना शोध मोहीम रात्री बारा वाजता थांबवण्यात आली. त्याठिकाणी फक्त काही कर्मचारीच शिल्लक ठेवून बाकी कर्मचाऱ्यांनी आपली जागा सोडली अशा परिस्थितीत बिबट्या रात्रीचा प्रवास करतो हे माहीत असतानाही त्याला शेतात सोडून जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

एका ठिकाणी बिबट्या आढळून आल्यानंतर चहुबाजुंनी घेराव घालून तब्बल आठ तास आपण ज्या ठिकाणी वेळ घालवला. त्या ठिकाणी जोपर्यंत बिबट्या आढळून येत नाही तोपर्यंत अपेक्षित नव्हते तरीही तसे झाले असेल तर हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यातही बिबट्या तब्बल दोन ते तीन वेळा त्याच शेतीत असल्याचा पुरावा म्हणून स्वतः बिबट्या समोर येऊन गेला. पण त्यावेळी शार्प शुटर ही काही करू शकले नाही. त्यामुळेच आता बिबट्या पकडण्याचा ठहेतुच शंका उपस्थित होईल अशा पद्धतीचे काम सुरू आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE